Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 23 September 2026, 13:46

लोणी काळभोर, ता. 23 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बाजार मैदानातील भाजी मंडईत महिलांमध्ये वादाचे पर्यवसान धक्काबुक्की, मारहाण आणि शिवीगाळीत झाल्याची घटना मंगळवारी (ता. 22 सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकींना धक्काबुक्की करून हाताने मारहाण करत दंगा केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री सुनील देसर्डा (वय 50), ज्योती तेजस देसर्डा (वय 29 ) आणि मीरा रामप्रसाद मंत्री (वय 52, सर्व रा. पालखीस्थळ, लोणी स्टेशन, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार कविता संपत साळवे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील बाजार मैदानात संबंधित तिन्ही महिला एकमेकींशी वाद घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाद वाढल्यानंतर तिघींनी एकमेकींना धक्काबुक्की केली तसेच हाताने मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिन्ही महिलांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली.

याप्रकरणी तिन्ही महिलांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 194 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार संजय शिंदे करत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रुपाली चाकणकरांच्या विधानाने ठिणगी! रुपाली ठोंबरेंचा संताप, ‘लिपस्टिक लावली म्हणजे…’

Wednesday, 23 September 2026, 15:17

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त ‘याच’ चौकातून मिळणार प्रवेश

Wednesday, 23 September 2026, 15:12

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरखाली दुचाकी चिरडली, आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

Wednesday, 23 September 2026, 14:19

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

Wednesday, 23 September 2026, 13:55

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 13:46

चावी हरवली अन् आयुष्यच संपलं! पतीने केली पत्नीची हत्या; 19 वर्षीय जरीनसोबत घडलं भयंकर

Wednesday, 23 September 2026, 13:45
Next Post

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp