Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 13:55

डॉ. अशोक बालगुडे

मुंबई: धार्मिक उत्सव आणि मिरवणुकांना विरोध नाही. मात्र त्याच्या नावाखाली ध्वनी व वायुप्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे निर्देश देतानाच मिरवणुकांमधील ध्वनीची पातळी मोजून नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे संकेत न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनिप्रदूषणासंदर्भातील स्वतःहून दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत ही भूमिका मांडली. उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांच्या आरोग्याच्या आणि शांततेच्या अधिकाराच्या किंमतीवर असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मिरवणुकांमध्ये पोलिसांनी डेसिबल मीटरद्वारे ध्वनीची पातळी प्रत्यक्ष मोजावी आणि त्याची नोंद पंचनाम्यात करावी, तसेच मर्यादा ओलांडणाऱ्या ध्वनियंत्रणांवर कायद्यानुसार कारवाई व जप्ती करावी, असे न्यायालयाने सांगितले. ध्वनिक्षेपकाची परवानगी मिळालेल्या मंडळांनी ती परवानगी ठळकपणे प्रदर्शित करावी, अशी सूचनाही करण्यात आली.

 

सार्वजनिक रस्त्यांवरील फटाक्यांमुळे ध्वनीबरोबरच वायुप्रदूषण आणि अपघातांचा धोका वाढतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचप्रमाणे डीजे, ध्वनिक्षेपक आणि आवाज निर्माण करणाऱ्या धातूच्या सिलिंडरच्या वापरावरही न्यायालयाने आक्षेप नोंदवला. नियमभंग झाल्यानंतर दंड करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, हजारो वारकरी टाळ-मृदंग आणि अभंग-भजनाच्या साथीने वारी करतात. मात्र त्यातून नागरिकांना त्रासदायक ध्वनिप्रदूषण निर्माण होत नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. उत्सवाची भव्यता म्हणजे मोठा आवाज नव्हे, तर श्रद्धा, परंपरा आणि नागरिकांच्या अधिकारांचा समतोल साधणे हा या भूमिकेचा गाभा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरखाली दुचाकी चिरडली, आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp