अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पिकअप वाहनातील ११ जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन पुरुष व एक महिला यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनाला धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिला यांचा जागीच मृत्यू झाला, तर पिकअपमधील ११ जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातात प्रवीण गोरख कागदे, सारिका मच्छिंद्र कागदे, दीपक चव्हाण अशी मृतांची नावे आहेत. तर सुरज बजरंग कागदे, पिकअप चालक बजरंग शेषराव कागदे, धीरज मच्छिंद्र कागदे, मच्छिंद्र शेषराव कागदे, राहुल गोरख कागदे, सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे, आरती प्रवीण कागदे, आरती बजरंग कागदे, श्रुती मच्छिंद्र कागदे, धीरज राजाभाऊ जोगदंड अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तर
काही जखमी धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असून, काही जखमी हे बीड जिल्ह्यातील आहेत. या घटनेत एकाच कुटुंबाबतील तिघेजण मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे पुणे येथून पिकअप अहमदनगरकडे येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्सने या पिकअपला जोरदार धडक दिली. यात पिकअपमधील तिघेजण जागीच ठार झाले तर ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये पिकअप चालक व ट्रॅव्हल्स चालकाचाही समावेश आहे. आहे.
याप्रकरणी दोन्ही वाहने अहमदनगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान पिकअप वाहनातुन संपूर्ण कागदे कुटुंब पुण्याहून नगरकडे येत होते. अपघात झाल्यानंतर पिकअपमधील संपूर्ण कागदे कुटुंब जखमी झाले तर याच कुटुंबातील प्रवीण गोरख कागदे व सारिका मच्छिंद्र कागदे हे गतप्राण झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत कागदे कुटुंबावर शोककळा पसरली.
मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा व खंडाळादरम्यान असलेल्या एका हॉटेलसमोरील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर उलटला. त्याची धडक दोन दुचाकींना बसली. त्यात एका लहान मुलींसह दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सविता गणेश लायगुडे, लता नागेश ढुमणे, सात वर्षीय ओवी नागेश ढुमणे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून गणेश लायगुडे, नागेश ढोमणे व एक लहान मुलगा या अपघातात जखमी झाले आहेत.