पुणे : पंचांगानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
मेष राशीच्या लोकांनो आज हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घेतली तर कामे लवकर मार्गी लागतील
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनो आज वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेट संबंधित कामे पुढे जातील, महिला उत्साही राहतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या सहकाऱ्यांची मदत चांगली मिळेल, मुलांना काही गोष्टी समजावून सांगण्यात बरीच शक्ती खर्च होईल
कर्क
कर्क राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून अडकलेली कामे प्रगतीपथावर राहतील, त्याला थोडा कष्टाचा टेकू द्या
सिंह
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी असलेल्या कलेची कदर करणारी मंडळी भेटतील
कन्या
कन्या राशीच्या लोकांनो आज हातून चांगली निर्मिती होईल, त्यातून आर्थिक फायदाही मिळेल
तूळ
तूळ राशीच्या लोकांनो आज शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांचे म्हणणे जिंकून घ्याल, घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक काम करताना तुम्हाला तेथे जातीने हजर राहावे लागेल
धनु
धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल, तब्येत बिघडू नये याची काळजी घ्यावी
मकर
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील, पैसा मिळवण्यापेक्षा खर्च होण्याचे योग्य जास्त आहे
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी अचानक आपले अभ्यासाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे
मीन
मीन राशीच्या लोकांनो सर्व गोष्टींचे विचार करून नियोजन केले तर यश मिळेल.