Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी खुर्दमध्ये इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून मुद्देमाल लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 6 September 2026, 11:26

थेऊर : बंद गोदामाच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करत चोरट्यांनी इलेक्ट्रिक साहित्यावर डल्ला मारल्याची घटना मांजरी खुर्द परिसरात घडली. चोरट्यांनी गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून तब्बल1 लाख 10 हजार 793 रुपयांचे कॉपर केबल, आर्थिंग कॉपर प्लेट, कॉपर रोड आणि वायरचे बंडल लंपास केले. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मांजरी खुर्द येथील चिंतामणी पार्क परिसरात कविता गजानन जाधव यांच्या नावावर ‘साई पॉवर सोल्युशन’ हे फर्म असून, एमएसईबीशी संबंधित कामासाठी लागणारे विविध इलेक्ट्रिक साहित्य त्यांच्या गोदामात ठेवण्यात येते. हे गोदाम गरजेनुसार तीन-चार दिवसांतून एकदा उघडले जाते.

9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास गोदाम बंद करून कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता गोदाम उघडण्यासाठी गेलेल्या गजानन जाधव यांना कुलूप जमिनीवर पडलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता कॉपर केबल, आर्थिंग कॉपर प्लेट, कॉपर रोड आणि वायरचे बंडल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये 11 ऑगस्ट रोजी पहाटे 2.18 ते 2.54 या कालावधीत दोन अनोळखी इसम भिंतीवरून उडी मारून गोदामाच्या आवारात शिरताना दिसले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकले आणि गोदामात प्रवेश करून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. विशेष म्हणजे, गोदामातून बाहेर पडताना चोरट्यांनी कॅमेऱ्यावरील कापड काढून तेही सोबत नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.

 

दरम्यान, चोरीला गेलेल्या मालामध्ये 35 हजार रुपयांचे कॉपर केबलचे 10 बंडल, सुमारे 20 हजार रुपयांच्या आर्थिंग कॉपर प्लेट, 25 हजार 794 रुपयांचे आर्थिंग कॉपर रोड आणि सुमारे 30 हजार रुपयांचे विविध आकाराचे कॉपर वायर बंडल असा एकूण 1 लाख 10 हजार 793 रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरु आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55
Next Post

सोरतापवाडीत भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp