नवी दिल्ली : आपल्या भारतासह जगभरात अनेक जागतिक वारसा स्थळे, ऐतिहासिक वास्तू आणि राजवाडे आणि नैसर्गिक दृश्यांनी परिपूर्ण ठिकाणे आहेत. भारत हा एक देश आहे जो आपल्या सांस्कृतिक विविधता, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात अशी काही पर्यटनस्थळं आहेत ती देशातीलच नाहीतर परदेशातील नागरिकांनाही भुरळ घालतात.
देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक परदेशी पाहुणे येतात. दिल्लीत हुमायूँचा मकबरा, कुतुबमिनार, इंडिया गेट अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या जगप्रसिद्ध आहेत. याशिवाय भव्य चांदणी चौक बाजार आणि कॅनॉट प्लेस पर्यटकांना आकर्षित करतात. 2021 मध्ये दिल्लीत एक लाखाहून अधिक विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. तसेच 2023 मध्ये 18 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक दिल्लीत आले.
राजस्थानची राजधानी जयपूर येथेही अनेक परदेशी पर्यटक भेटी देत असतात. यामध्ये अंबर किल्ला, हवा महल, अजमेर किल्ला आणि सिटी पॅलेस या ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील रंगीबेरंगी बाजार आणि स्थानिक कला पर्यटकांना आकर्षित करतात. जयपूरचा शाही आदरातिथ्य आणि भव्यता पाहण्यासाठी जगभरातून विदेशी पर्यटक येथे येतात.
आग्रा येथे पर्यटक पसंती देताना दिसतात. ताजमहाल, केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. जे आग्रा जिल्ह्यात आहे. ताजमहालचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश आहे. ताज पाहण्यासाठी भारतातील विविध शहरांमधून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक आग्रा येथे पोहोचतात.