पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरात भर दुपारी एक तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरूणावर हल्ला केल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा थरारक व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तपास पुणे पोलीसांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात 2 ते 3 जणांच्या टोळीने एका तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे दत्तवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.