Solapur News : सोलापूर : ग्रामीण भागात मालमत्ता असणाऱ्या धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ग्रामपंचायतीत नोंद असलेल्या मालमत्तांवर आता पतीसोबत पत्नीचेही नाव असणार आहे. पतीने परस्पर घरजागा विक्री करू नये, जागेवर कर्ज घेताना पत्नीला माहिती व्हावे यासह इतर काही कारणांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यापूर्वी पतीकडून परस्पर घरजागा विक्री करणे आणि जागेवर कर्ज घेणे असे प्रकार सुरू होते. मात्र, आता पत्नीला माहिती व्हावे आणि भविष्यात परस्पर घरजागा विकून बेघर होऊ नये, (Solapur News) घरजागेत तिलाही समान हक्क असावा आणि ग्रामपंचायतीची घरपट्टी भरण्यासाठी पत्नीही बचत करेल, त्यातून ग्रामपंचायतींची थकबाकी कमी होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता घरजागेच्या उताऱ्यावर पतीच्या नावासमोरच पत्नीचे नाव नोंदविले जात आहे. त्यासाठी शासनाच्या 2008 च्या निर्णयाचा आधार घेतला जात आहे.
महिलांचीच झाली मोठी मदत
घरजागेच्या उताऱ्यावर पतीबरोबरच पत्नीचे नाव देखील नोंदविल्याने कर भरण्यासाठी महिलांचीच मोठी मदत केल्याचे काही जण सांगतात. अक्कलकोट, सांगोला, बार्शी, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कर व पाणी पट्टीतून अंदाजे 14 कोटी 23 लाख रुपये जमा होतात. (Solapur News) उर्वरित मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा व मंगळवेढा या तालुक्यातील ग्रामपंचायतीचेही उत्पन्न 25 कोटींचे आहे.
मालमत्ता करातून 39 कोटी जमा
मालमत्ता करावर पत्नीचेही नाव आता उताऱ्यावर लावले गेल्याने 2022-23 मध्ये मालमत्ता करातून 39 कोटी 39 लाखांपर्यंत (92.39 टक्के) जमा झाले आहेत .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur News : पन्नाशीत आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’