Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : माढ्यात ‘एक्साईज’च्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला ; ‘आम्हीच दिसतो का?’ म्हणत ढाबा मालकाकडून बेदम मारहाण, उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 25 April 2026, 19:14

Solapur News : सोलापूर, ता. 25 : माढा तालुक्यातील उपळाई हद्दीतील ‘येडेश्वरी’ ढाब्यावर अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर ढाबा मालकाने आपल्या साथीदारांसह भीषण हल्ला केला. “राज्यात सगळीकडे मद्यविक्री सुरू आहे, मग तुम्ही आमच्याच ढाब्यावर कसे येता?” असा सवाल करत ढाबा मालकाने दोन अधिकाऱ्यांना प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात उपनिरीक्षक अमित नागरे आणि अंमलदार युवराज टिळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री क्रमांकावर माहिती मिळाली होती की, माढा तालुक्यातील जगदंबा आणि येडेश्वरी या ढाब्यांवर अवैध मद्यविक्री सुरू आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २२ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास उपनिरीक्षक अमित नागरे यांचे पथक कारवाईसाठी तिथे पोहोचले. पथकाने कारवाई सुरू करताच येडेश्वरी ढाब्याचा मालक प्रमोद गोरे पाटील ऊर्फ गोट्या याने पथकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

कारवाई सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंमलदार पुरावा म्हणून मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करत होता. हे पाहून चिडलेल्या आरोपीने अंमलदाराचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो परत देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने गावातील आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेतले आणि पथकाला वेढा घातला.

 

आरोपी प्रमोद गोरे आणि त्याच्या साथीदारांनी उपनिरीक्षक नागरे आणि टिळे यांना प्लास्टिक पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. “बाकीचे ढाबे दिसत नाहीत का?” असे ओरडत आरोपीने या अधिकाऱ्यांना रक्ताळू केले. या मारहाणीत उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद गोरे पाटील हा सराईत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अवैध मद्यविक्रीचे दोन गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई होऊनही त्याची मुजोरी कमी झाली नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

कडक कारवाईचे संकेत
या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी तातडीने दखल घेतली आहे. “शासकीय कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Loni Kalbhor News: Employee commits suicide in chicken shop; Reason unclear

काळेपडळ येथे वेल्डिंगपत्राचे काम करताना कामगार उच्च दाब तारेला चिकटला, उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.