Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काळेपडळ येथे वेल्डिंगपत्राचे काम करताना कामगार उच्च दाब तारेला चिकटला, उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 19:15
Loni Kalbhor News: Employee commits suicide in chicken shop; Reason unclear

हडपसर, ता. 25 : काळेपडळ परिसरात निष्काळजीपणाचा भीषण बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेल्डिंगचे काम करत असताना एका कामगाराचा उच्च दाब वीजतारेच्या संपर्कात येऊन गंभीर अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.19) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. महादेव रघुनाथराव कल्तिकर (वय 33) हे वेल्डिंगचे काम करत असताना अचानक उच्च दाब तारेच्या संपर्कात आले. या अपघातात ते सुमारे 70 टक्के भाजले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र गुरुवारी (ता.23) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महादेव कल्तिकर यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या 8 महिन्यांचा मुलगा असा परिवार असून, या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर थेट आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

 

विशेष म्हणजे, साई विहार परिसरातील नागरिकांनी 2021 पासूनच या धोकादायक उच्च दाब तार हटवण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. “जर वेळेत उपाययोजना केली असती, तर आज एका कुटुंबाचा कर्ता वाचला असता,” असा संतप्त सूर नागरिकांनी व्यक्त केला. या घटनेनंतर महावितरणकडून तत्काळ मदत देण्यात यावी, तसेच संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, काळेपडळमधील ही घटना केवळ अपघात नसून, दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा अशा “मृत्यूच्या सापळ्यां”मुळे आणखी किती जीव जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Loni kalbhor

Loni Kalbhor : थेऊर फाट्यावरील जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा ; सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालासह 7 जणांना बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.