Shirur News : न्हावरे, (पुणे) : न्हावरे (ता.शिरूर) येथील तालुक्यातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि शेतकरी कर्ज वाटपात अग्रगण्य असलेल्या न्हावरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब धायगुडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. Shirur News

संस्थेचे अध्यक्ष विजय कदम आणि उपाध्यक्ष गणेश खंडागळे यांनी इतर सहकारी संचालकांना संधी मिळावी, या उद्देशाने स्वेच्छेने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर सुरेश खंडागळे आणि हिरामण करपे यांची निवड करण्यात आली. झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी सर्वानुमते एकमत झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश चव्हाण यांनी काम पाहिले. Shirur News
दरम्यान निवड जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष सुरेश खंडागळे आणि उपाध्यक्ष हिरामण करपे यांचा गावातील मान्यवर,संचालक आणि सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात सत्कार करण्यात आला.नव्या पदाधिकाऱ्यांकडून संस्थेच्या प्रगतीसह शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावी कामकाज होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. Shirur News





