Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत ‘मतदार’ गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 27 April 2026, 17:17

Shirur Market Committee : शिरूर, (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवरून मोठा वाद निर्माण झाला असून, प्रारूप मतदार यादीत झालेल्या कथित घोळामुळे तब्बल 797 ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. Shirur Market Committee

13 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींपैकी केवळ 18 ग्रामपंचायतींचे 206 सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत.उर्वरित ग्रामपंचायतींच्या सदस्यांना थेट डावलण्यात आल्याने या निवडणूकीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणी माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत प्रशासनावर थेट हल्लाबोल चढवला आहे. Shirur Market Committee

 

पवार यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, 23 व 24 फेब्रुवारी 2026 रोजी मुदत संपलेल्या 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले, मात्र, या ग्रामपंचायतींचे तब्बल 729 सदस्य मतदार यादीतून वगळण्यात आले.तसेच,२०२४ मध्ये प्रशासक नेमलेल्या ७ ग्रामपंचायतींतील आणखी 68 ग्रामपंचायत सदस्यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. Shirur Market Committee

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारी 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आलेला असताना,त्यानंतर झालेल्या प्रशासक नियुक्तीचा आधार घेऊन सदस्यांना वगळणे हा नियमांचा सरळसरळ भंग असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.“अर्हता दिनांकापूर्वी अस्तित्वात असलेले सर्व सदस्य मतदानास पात्र असताना, त्यांना डावलणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेची उघड गळचेपी,” असा घणाघात त्यांनी केला आहे. Shirur Market Committee

या पार्श्वभूमीवर,शिरूर तालुक्यातील 797 सदस्यांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा निवडणुकीच्या पारदर्शकतेवर घाला घालणारा असून,प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून सर्व पात्र सदस्यांचा समावेश करावा,अशी जोरदार मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समित्या(समितीची निवडणूक) नियम-2017 तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार शिरूर बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सन 2026 -2031 या कालावधीसाठी होत आहे. Shirur Market Committee

दरम्यान, प्रारूप मतदार यादी 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली असून, 27 एप्रिलपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविण्याची मुदत आहे. त्यानंतर 7 मे रोजी निर्णय घेऊन 12 मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. निवडणुकीपूर्वीच मतदार यादीवरून पेटलेला हा वाद पुढे अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून,सहकार विभाग यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. Shirur Market Committee

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून आडोसा, पण पुढील 3 दिवस घामाच्या धारा! हवामान विभागाकडून उकाडा वाढण्याचा इशारा

Sunday, 24 May 2026, 12:33

प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात!’क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्या अन् मोठा अनर्थ टळला…

Sunday, 24 May 2026, 12:17

Wagholi Sex Racket :   ‘9 सेन्सेस स्पा’वर मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, पाच महिलांची सुटका तर मॅनेजरला बेड्या

Sunday, 24 May 2026, 10:14

Loni Kalbhor News : “२० टक्के परतावा”च्या आमिषाने गृहिणीची 20 लाखांची फसवणूक, पतीच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sunday, 24 May 2026, 9:50
अट्टल गुन्हेगार राज पवार

Big Breaking News : गुंड राज पवार टोळीची पेट्रोल पंपावर दहशत, कोयत्याचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर भरले फुकट पेट्रोल

Sunday, 24 May 2026, 9:46

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02
Next Post

Uruli Kanchan Crime : “उरुळी कांचनला या… अवैध धंद्यांचे खुलेआम निमंत्रण?” देहविक्री, मटका-जुगार, गांजासह हातभट्टीचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.