Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : “२० टक्के परतावा”च्या आमिषाने गृहिणीची 20 लाखांची फसवणूक, पतीच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 May 2026, 9:50

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. २४ : “पुणे मेट्रो कंपनीशी टायअप आहे… दरमहा २० टक्के परतावा मिळेल…” असे आमिष दाखवत एका गृहिणीकडून तब्बल २० लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर परिसरात उघडकीस आला आहे. सुरुवातीला काही महिन्यांचा परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला, मात्र त्यानंतर लाखो रुपये बुडाल्याने संबंधित कुटुंब उद्ध्वस्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे, या आर्थिक तणावातून फिर्यादी महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor News

अतुल शामराव पवार ( रा. नांदवळ, ताकोरेगाव, जि. सातारा) आणि संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपुर्ती पार्क, राहींजवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुनम प्रमोद पवार (वय ५०, सध्या रा. पिंपरी, पूर्वी रा. कुशलवाटिका सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनम पवार या ऑनलाईन पुरणपोळीच्या ऑर्डरचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०२० मध्ये पुनम पवार आणि त्यांच्या पतीने चार एकर शेती विकून सुमारे २० लाख रुपये मिळवले होते. ही माहिती गावातीलच ओळखीचे असलेले अतुल शामराव पवार याला होती. त्यानंतर अतुल पवार आणि त्याची पत्नी यांनी पुनम पवार यांच्या घरी जाऊन गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला. Loni Kalbhor News

“माझे मित्र संतोष काकडे यांचे नागार्जुन ग्रुप आणि पुणे मेट्रो कंपनीशी टायअप आहे. पैसे गुंतवले तर दरमहा २० टक्के परतावा मिळेल,” असे आमिष दाखवत त्यांनी गुंतवणुक करण्यास भाग पडले. सुरुवातीला पुनम पवार यांनी नकार दिला होता. मात्र, अतुल पवार हा वारंवार त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पतीला दारू पाजत होता आणि पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत होता. यामुळे पती-पत्नीमध्ये वादही सुरू झाले होते. अखेरीस ५ सप्टेंबर २०२० आणि १६ ऑक्टोबर २०२० रोजी प्रत्येकी १० लाख रुपये अशा एकूण २० लाख रुपयांची रक्कम अतुल पवार यांच्या ‘वर्ल्ड ट्रेडिंग कंपनी’च्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. Loni Kalbhor News

 

सुरुवातीच्या चार महिन्यांत प्रत्येकी एक लाख रुपये परतावा देण्यात आला. त्यामुळे फिर्यादींचा विश्वास आणखी वाढला. मात्र, त्यानंतर अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. पुनम पवार आणि त्यांचे पती पैसे मागण्यासाठी गेले असता, संतोष काकडे यांनी “तुम्ही मला पैसे दिले का? अतुल पवारकडून पैसे घ्या,” असे म्हणत घराबाहेर हाकलून दिले. यावेळी शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली आहे.या घटनेनंतर फिर्यादी महिलेचे पती मानसिक तणावाखाली गेले आणि काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला. Loni Kalbhor News

दरम्यान, पुनम पवार यांनी पैसे परत मिळवण्यासाठी आरोपींकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आरोपींकडून टाळाटाळ आणि धमक्या दिल्या आहेत. याप्रकरणी पुनम पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल शामराव पवार आणि संतोष सुरेश काकडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(1),316(2),318(4),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20
Next Post

Wagholi Sex Racket :   ‘9 सेन्सेस स्पा’वर मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, पाच महिलांची सुटका तर मॅनेजरला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp