Wagholi Sex Racket पुणे, ता. २४ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने वाघोली (ता. हवेली) येथील एका आलिशान स्पा सेंटरवर टाकलेल्या धाडीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बकोरी फाटा परिसरातील “9 सेन्सेस स्पा” या सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी स्पा मॅनेजरला ताब्यात घेतले असून स्पाचा मालक फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून लाखो रुपयांचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Wagholi Sex Racket

स्पा मॅनेजर महावीर सुदाम ससाने असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार नामदेव भिवरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना “9 सेन्सेस स्पा”, रेम्बो क्रॉसेस बिल्डिंग, पहिला मजला, बकोरी फाटा, वाघोली येथे मसाजच्या नावाखाली महिलांकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण कारवाईचे गुप्त नियोजन करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईसाठी बनावट ग्राहक, एक महिला पंच आणि एक पुरुष पंच यांची नियुक्ती केली. बनावट ग्राहकाला ५ हजार रुपयांच्या क्रमांक नोंदवलेल्या नोटा देण्यात आल्या. त्याला स्पामध्ये जाऊन प्रत्यक्ष काय सुरू आहे, याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. Wagholi Sex Racket

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बनावट ग्राहक स्पामध्ये गेला. काही वेळाने त्याने पोलिसांना “Come fast” असा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून देहविक्री सुरू असल्याची खात्री दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ स्पावर धाड टाकली. छाप्यात पोलिसांनी “ऑर्चीड” नावाच्या मसाज रूममध्ये प्रवेश केला असता, तेथे एक महिला आणि बनावट ग्राहक आढळून आले. चौकशीत संबंधित महिलेकडून मसाजदरम्यान “एक्स्ट्रा सर्व्हिस” आणि वेश्यागमनासाठी २ हजार रुपये मागण्यात आल्याचे समोर आले. महिलेने बनावट ग्राहकाकडून घेतलेल्या क्रमांकित नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच काऊंटरवरून मसाज फी म्हणून घेतलेले १,५०० रुपयेही पोलिसांनी हस्तगत केले. Wagholi Sex Racket
‘हँडजॉब’, ‘बॉडी टू बॉडी’सह देहविक्री; महिलांचा धक्कादायक खुलासा
पोलिसांनी महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, स्पा मॅनेजर महावीर सुदाम ससाने आणि स्पा मालक हरिश राजू वाघमारे हे जास्त पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून देहविक्री करवून घेत असल्याचे समोर आले. ग्राहकांकडून “हँडजॉब”, “बॉडी टू बॉडी”, तसेच वेश्यागमनासाठी वेगवेगळे दर आकारले जात होते. मिळालेल्या पैशातील निम्मी रक्कम स्पा मॅनेजर आणि मालक घेत असल्याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली. Wagholi Sex Racket
स्पामध्ये सापडल्या अनेक मसाज रूम्स; रेटकार्डही जप्त
पोलिसांनी स्पाची झडती घेतली असता, “जास्मीन”, “ऑर्चीड”, “वॉटरलिली”, “चेरी” आणि “ब्लॉसम” अशा नावांच्या स्वतंत्र मसाज रूम्स आढळून आल्या. प्रत्येक रूममध्ये बेड, टॉवेल, टिश्यू पेपर आणि मसाज ऑईल ठेवण्यात आले होते. स्पामधून पोलिसांनी ३६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, पेटीएम स्कॅन मशीन, फोनपे क्यूआर स्कॅनर आणि स्पाचे रेटकार्ड यांचा समावेश आहे. Wagholi Sex Racket
दरम्यान, या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी स्पा मॅनेजर महावीर ससाने आणि स्पा मालक हरिश वाघमारे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस हवालदार तुषार भिवरकर, आंधळे, केदार, जाधव, रसाळ, कोंडे, कंक, खेडेकर यांच्या पथकाने केली आहे.







