Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 May 2026, 19:02

Manjari Arrested News लोणी काळभोर, ता. २३ : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी पुन्हा पुण्यातच मुक्तपणे फिरताना गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मांजरी गावातील अक्षय रेस्टॉरंट बारसमोर सार्वजनिक रस्त्याजवळ पोलिसांना पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने त्याचा पाठलाग करून काही क्षणांतच त्याला २२ मे रोजी रात्री जेरबंद केले. या कारवाईमुळे हद्दपार आरोपींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. Manjari Arrested News

दत्ता गणेश गायकवाड (वय ४४, रा. गणपती मंदिर चौक, केशवनगर, मुंढवा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून वरिष्ठांच्या आदेशानुसार “कॉम्बिंग आणि राऊंड अप ऑपरेशन” राबवण्यात येत असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान २२ मे रोजी रात्री गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गणेश विश्वनाथ माने, पोलीस हवालदार देशमुख, सकटे आणि श्रीकांत पांडुळे हे मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

दरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, “दत्ता गणेश गायकवाड” हा हद्दपार आरोपी मांजरी गावातील अक्षय रेस्टॉरंट बारसमोर सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरत आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत घटनास्थळी धाव घेतली. Manjari Arrested News

पोलिसांचे वाहन आणि पथक जवळ येताना पाहताच संबंधित आरोपी घाबरला आणि घाईघाईने तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून २०.४५ वाजण्याच्या सुमारास त्याला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव दत्ता गणेश गायकवाड असे सांगितले.

 

पुढील तपासात धक्कादायक बाब समोर आली. पुणे शहर पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ यांनी संबंधित आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. तरीही आरोपी कोणतीही न्यायालयीन किंवा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता पुण्यात वावरत असल्याचे स्पष्ट झाले. Manjari Arrested News

दरम्यान, पोलिसांनी आरोपीची चौकशी करून त्याची ई-साक्ष अॅपद्वारे नोंद केली असून, त्याला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20
Next Post

Gambiva Casino – Cada sesión cuenta una historia en España

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp