Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : गुंड राज पवार टोळीची पेट्रोल पंपावर दहशत, कोयत्याचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर भरले फुकट पेट्रोल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 May 2026, 9:46
अट्टल गुन्हेगार राज पवार

Photo- PPN

Big Breaking News लोणी काळभोर, ता. २४ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गुंड राज पवार व त्याच्या तीन साथीदारांनी कवडीपाट येथील सागर वाईन्स अँड बारमध्ये बाटल्या फोडून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, “आम्ही या भागातील भाई आहोत…” अशी धमकी देत राज पवार व त्याच्या दोन सहकाऱ्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १६ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Big Breaking News

राज पवार, प्रेम गायकवाड (वय माहिती नाही) आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिक किसनराव सोळुंके (वय २१, रा. कदमवाकवस्ती, मूळ रा. लातूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Big Breaking News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक हे पुणे–सोलापूर महामार्गालगत मनाली रिसॉर्टजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मागील चार महिन्यांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. १६ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रतिक सोळुंके आणि त्यांचा सहकारी सागर मुसळे हे पेट्रोल पंपावरील काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून राज पवार, प्रेम गायकवाड आणि त्यांचा एक साथीदार पेट्रोल पंपावर आले. त्यांनी रात्रपाळीवरील कर्मचारी सिद्धार्थ आव्हाड याला शिवीगाळ करत “आमचे गाडीमध्ये पेट्रोल टाक… टाकी फुल कर… पैसे मागायचे नाहीत” अशी दमदाटी सुरू केली. Big Breaking News

 

सिद्धार्थ आव्हाड याने पेट्रोल भरण्यास नकार दिला असता, राज पवार याने “कोयता काढ रे… ह्याला लय माज आला आहे… ह्याचा गेमच करून टाकतो…” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भीतीपोटी कर्मचाऱ्याने त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून टाकी फुल केली. यावेळी प्रतिक सोळुंके आणि सागर मुसळे यांनी संबंधित तरुणांकडे पेट्रोलचे बिल मागितले असता, प्रेम गायकवाड याने हातावरील रक्त दाखवत “आत्ताच एकाचा गेम करून आलोय… तुझा पण करू का?” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर गाडीला लावलेला कोयता दाखवत “यापुढे आम्ही आलो की गप पेट्रोल भरायचे… पैसे मागायचे नाहीत,” असे म्हणत शिवीगाळ केली आणि तिघे तेथून पसार झाले.

या प्रकारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रचंड घाबरले. “ते आम्हाला मारून टाकतील,” या भीतीने फिर्यादी प्रतिक सोळुंके हे थेट आपल्या मूळ गावी लातूरला निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंप मालक नंदकिशोर काळभोर यांना फोनवरून संपूर्ण घटना सांगितली. अखेर पुण्यात परतल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी राज पवार, प्रेम गायकवाड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(५), ३(५), शस्त्र अधिनियम कलम २५(४) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, ३७(१), ३७(३) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. Big Breaking News

दरम्यान, लोणी काळभोर परिसरात वाढती गुंडगिरी, कोयत्याचा धाक आणि ‘भाईगिरी’च्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. Big Breaking News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

Thursday, 30 July 2026, 17:19

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

Thursday, 30 July 2026, 16:56

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27
Next Post

Loni Kalbhor News : “२० टक्के परतावा”च्या आमिषाने गृहिणीची 20 लाखांची फसवणूक, पतीच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.