सुरेश घाडगे
परंडा : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रस्ताव पाठवा. त्वरित मंजूर करून घेतो. अशा सुचना पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री डॉ . प्रा. सावंत यांनी खानापूर, कुंभेजा, भोंजा, सोनारी या परिसरातील पिकांच्या नुकसानीची शुक्रवारी ( दि. २८) पाहणी केली. त्यावेळी बोलताना वरील सूचना सावंत यांनी केल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले कि, सोयाबीन, टमाटो, मिरची, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेवटच्या पावसापर्यंत शेतकऱ्याच्या पिकांचे जे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा, मंजूर करून घेतो. अश्या सुचना महसुल प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, उपास्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्री डॉ. प्रा. सावंत यांनी संवाद साधला. या भागात पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे वळले पाहिजे. या भागातील पाण्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांची मंजूरी केबीनेटच्या बैठकीत एकाच वेळी घेतली. देशातील इतकी मोठी मंजूरीची बहुदा ही पहिलीच घटना असल्याचे सांगून मंजूरी घेतली नसती तर अवघ्या काही दिवसांत हे काम बंद पडले असते.
यावेळी प्रतिष्ठाणचे रामचंद्र घोगरे, अण्णासाहेब जाधव , माजी नगरसेवक दत्ता रणभोर, माजी नगरसेवक शब्बीर पठाण, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, जयदेव गोफणे , श्याम मोरे, सतीश मेहेर, रत्नकांत शिंदे, बुरुंगे, तानाजी कोलते,वैभव पवार, गणेश नेटके, बालाजी नेटके आदी उपस्थित होते.