बापू मुळीक
सासवड : वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील राष्ट्रीय छात्र सेना विभाग हे केवळ शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रशिक्षण देणारे केंद्र नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे एक प्रेरणादायी मंच ठरले आहे. यंदा या विभागातील कॅडेट्सनी भारतीय सैन्य, नौदल, केंद्रीय व राज्य पोलीस सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यशस्वी कॅडेट्सची यादी पुढीलप्रमाणे – 36 MAH BN NCC (Army Senior Division) मधून भारतीय सैन्य दलात SGT प्रतिक खैरे, SUO प्रथम इंदळकर, CDT सुरज ठोंबरे, CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) मध्ये JUO तेजस कुंभारकर, SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये CDT रोहित चव्हाण यांनी यश संपादन केले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस मध्ये CDT गणेश हगवणे, 3 MAH NAVAL UNIT (Navy Senior Division) मधून भारतीय सैन्य दलात Ldg CDT प्रतीक भांडाळकर यांनी यश संपादित केले आहे.
तर मुंबई पोलीस दलात CDT प्रविण टकले, CDT तेजस भिंताडे व 2 MAH GIRLS BN मधून भारतीय नौदलात SUO सोनिया शिंदे तसेच ऋषिकेश कामथे, संदेश भगत असे एकूण १२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या सर्व कॅडेट्सना त्यांच्या एनसीसी प्रशिक्षणादरम्यान प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट गजेंद्र मनोहर अहिवळे, सब लेफ्टनंट सुनील शिंदे आणि डॉ. शीतल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सचिव ॲड. संदीप कदम, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, वाघीरे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संपूर्ण PDEA परिवारातर्फे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान सैन्य दलातील निवडीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सर्वांचं यश सहजासहजी मिळालेलं नाही, त्यानं यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आज आमच्या या विद्यार्थ्यांच्या निवडीनं महाविद्यालयाचा अभिमान सर्वदूर पोहचला आहे. त्याचा हा यशाचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मनोगत व्यक्त करण्यात आले.