अजित जगताप
वडूज : सुरक्षा ही मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.अन्न- वस्त्र- निवारा याचबरोबर सुरक्षा महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षा याचे पालन केल्यास आयुष्यमान वाढणार आहे असे प्रतिपादन खटावचे नायब तहसीलदार हेमंत दीक्षित यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वडूज आगार येथे झालेल्या सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी आगार प्रमुख विक्रम देशमुख,स. वा.अधिकारी बिस्मिला सय्यद, जेष्ठ पत्रकार शेखर जाधव, मुन्ना मुल्ला, अजित जगताप व पोलीस दलाचे शांताराम ओंबसे, दिपक देवकर, कुमार भोसले, भिमराव कांबळे,जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगारप्रमुख विक्रम देशमुख होते.
तसेच यावेळी वडूज एस.टी आगारातील वाहक -चालक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयातून आलेल्या सूचनानुसार दिनांक ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये वडूज ता खटाव येथील एस टी आगारात दीपप्रज्वलन करून सुरक्षा सप्ताह निमित्त उपयुक्त सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या आपण पाहतो की सुरक्षा न पाळल्यामुळे दरवर्षी अठरा ते वीस हजार लोकांना प्राण गमावा लागतो. एस.टी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक विधायक उपक्रम पूर्वी एस.टी महामंडळ राबवत होते. त्यावेळी आरोग्य पेटी प्रत्येक एस.टीमध्ये होते.
परंतु सध्या खाजगीकरण झाल्यामुळे शिवशाही या बस मध्ये तशी पेटी आढळून येत नाही. याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. त्यामुळे याबाबत शासनाने गांभीर आणि लक्ष द्यावा अशी विनंती करण्यात देखील यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला एस टी वडूज आगाराचे ए वी पवार ,एस आर बागल, एफ डी बागवान, एच बी हांगे, यु के खुडे, एस बी फडतरे, ए जी सूर्यवंशी, एच डी तुपे ,डी टी जाधव, वी डी गोफणे, वी ए लावंड, एस पी गायकवाड, पी व्ही थोरात,ए के हांगे , एस के देसाई, पी एस काळे,डी एस यादव, व्ही एस पोरे, ए पी लावंड ,बी बी लोखंडे,सी व्ही थोरात,ननावरे, भिसे आदी एस टी कर्मचारी उपस्थित होते.