नागपूर : नागपूर शहराच्या कामठी उपविभागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभ्यासात हुशार असलेल्या एका विद्यार्थ्याने विषयात कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात जाऊन नदीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपवल असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामठीतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील फाये यांचा १७ वर्षीय मुलगा आयुष फाये याने कन्हान नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.आयुष केंद्रीय विद्यालय, कामठी येथील ११वीचा विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार असलेल्या आयुषने एका विषयात कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर पालकांमध्ये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक सजगता बाळगण्याची गरज असल्याच म्हटलं आहे. चाचणीत आयुषला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. यावर शिक्षकाने त्याला वडिलांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले. वडिलांचा पोलिस अधिकारी म्हणून असलेला शिस्तप्रिय स्वभाव आणि शिक्षकाची सूचना यामुळे आयुषवर मानसिक ताण निर्माण झाला. तो अत्यंत अस्वस्थ झाला आणि कोणालाही न सांगता संध्याकाळी घराबाहेर पडला. त्यानंतर त्यांने नदीत उडी घेऊनआपल्या आयुष्याची अखेर केली.