अजित जगताप
Satara News : वडूज, (सातारा) : वडूज ते दहिवडी रस्त्यावर अचानक आलेल्या पावसामुळे बाभळीचे झाड रस्त्यावरच कोलमडून पडले. त्यामुळे रस्त्यात वाहतूक समस्या निर्माण झाली होती. यावेळी वाई प्रांत कार्यालयातील नायब तहसिलदार हेमंत दीक्षित व त्यांचे नातेवाईक तथा छायाचित्रकार सूरज पोतदार यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने “साथी हाथ बढाना” असे समजून वाहतूक समस्या दूर केली. त्यामुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे. (Satara News)
गुरुवारी (ता. ०८) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वडूज- दहिवडी रस्त्यावर एका शोरूमच्या पुढील बाजूस भाबळीचे झाड कोसळून पडल्याची निदर्शनास आल्यानंतर सर्व जण मदतीची अपेक्षा करीत होते. यावेळी सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. (Satara News)
रस्त्यावरून प्रवास करणारे वाई प्रांत कार्यालयातील हेमंत दीक्षित व सुरज पोतदार यांच्या अचानक लक्षात आले की, वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. त्यामुळे स्वतः श्री दीक्षित हे गाडीतून उतरले व झाड पडलेले बाजूला करण्यास गेले. त्यामुळे नंतर मागून एक दोन प्रवासी उतरून त्यांना मदत करण्यास गेले. सदरचे झाड स्वतः नायब तहसिलदार हेमंत दीक्षित यांनी बाजूला केले व वाहतूक सुरळीत झाली. (Satara News)
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार तातडीने उपाय योजना केल्यास लोकांना वेळेत मदत मिळते. त्याचाच भाग यावेळी पहाण्यास मिळाला. विधायक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने महसूल विभागातील अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र यांनी नागरिकांचे ही कर्तव्य पार पाडले. (Satara News)
दरम्यान, याबबत रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुक्यातील अध्यक्ष कुणाल गडांकुश, ए गटाचे सागर भिलारे, मनसेचे सूरज लोहार, कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे, परेश जाधव, धनाजी चव्हाण, अनिल माळी आदी मान्यवरांनी दीक्षित व पोतदार यांचे कौतुक केले. (Satara News)