अजित जगताप
वडूज : Satara- लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली. त्याच्या पुढे जाऊन मोठ्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला. परंतु ,मूलभूत प्रश्न बाबत फारच गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेक ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहेत. (Satara) खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीत सध्या चार दिवस झाले घंटागाडी बंद असल्याने आजूबाजूच्या परिसरात कचरा टाकण्यास नागरिक धन्यता मानत असल्याचे चित्र दिसत आहे. (Satara)
कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्र बसवण्यात आलेली नाही
याबाबत माहिती अशी की, हिंगणे ता. खटाव गावच्या प्रवेशद्वारा नजीक वडूज नगरीतील कचरा डेपो निर्मिती तसेच या कचऱ्याची प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभे करण्यात आली. परंतु, सदर ठिकाणी पत्र्याचे शेड उभारल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्र बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे हिंगणे ग्रामस्थांचा संयमाचा तोल सुटून त्यांनी कचरा गाडी टाकण्यात सामुदायिक रित्या बंदी घातली त्यानंतरच वडून नगरपंचायतीला जाग आली गेले दोन वर्ष याबाबत नेमकं वळून नगरपंचायतीने काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने अखेर हा प्रश्न उपस्थित झाल्याची चर्चा होऊ लागलेली आहे.
मुळातच वडूज नगर पंचायतीचा कारभार हा दोन राजकीय पक्षांमध्ये व अपक्ष नगरसेवकांमध्ये एकवटलेला आहे. एखादा सण असला की संपूर्ण शहरभर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्याचे फलक लागली जातात. परंतु ,सध्या चार दिवस झाले नागरिकांना कचरा कुठे टाकावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे .पण याबाबत नागरिकांना सूचना करण्यासाठी चार दिवसाच्या कालावधीमध्ये नगरपंचायत प्रशासनाला जनहितार्थ काही सूचना करणे उपयुक्त वाटली नाही. ही खेदाची गोष्ट आहे.
नगरपंचायतीचा कचरा गोळा करण्यासाठी पाच घंटागाडी आहेत. त्या दिवसातून वीस फेऱ्या मारतात. आता या वीस फेऱ्या बंद झाल्यामुळे सदरचा कचरा हा आजूबाजूच्या परिसरात टाकला जात असून त्या ठिकाणी आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सब भूमी गोपाल की अशा पद्धतीने काही जण मोकळ्या जागेत कचरा टाकून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात ही दुर्गंधी पसरू लागलेली आहे. याबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित असताना कागदी घोडे नाचवले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : भाजप सावरकर गौरव यात्रेला वडूज हुतात्मा नगरीत उदंड प्रतिसाद….!
Vaduj News : कामाचे बिल न मिळाल्याने अपंग ठेकेदाराने केले विष प्राशन ; वडूज येथील घटना…!
Satara News : वडूज नगरीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध आंदोलन…!