अजित जगताप
सातारा : वडूज नगरपंचायत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना नोंदणी साठी शुल्क माफ केले आहे, त्यामुळे दोन वर्षाने होणाऱ्या वडूज परिसरातील गणेशोत्सवात नियमांचे पालन व्हावे अशी अपेक्षा वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक सणासुदीला वाहतूक अडथळा येऊ नये. यासाठी कार्यकर्त्यानी दक्ष राहिले पाहिजे. फलक, मंडप यासाठी वडूज नगरपंचायतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून एक आदर्श खटाव तालुक्याने निर्माण करावा. वीज, रस्त्याबाबत काही सूचना असतील तर त्याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल.
मिरवणुकीच्या मार्गावरील खांबांवरील तारा व वीज पुरवठा यासाठी अडचणी येऊ शकतात. मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यानंतर श्री चे विसर्जन मिरवणुकीत होते. नंतर त्याची विटंबना होऊ नये याची काळजी घ्यावी. साऊंडच्या आवाजाने प्रदूषण रोखण्यासाठी आपण कायद्याचे उल्लंघन करू नये. कुरोली, कातर खटाव, मायणी येथे धार्मिक विधी करताना अडचणी येऊ नये. अशा बहुमूल्य सूचना देशमुख यांनी दिल्या. वडुजचे मुख्याधिकारी अमित पंडित, वीज मंडळाच्या अमोल देसाई, राजकुमार कलशेट्टी, डॉ कुंडलिक मांडवे यांनी उपयुक्त सूचनांचे दखल घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी अजिंक्य कुलकर्णी, चंद्रकांत काटकर, कात, खटाव, मायणी येथे धार्मिक विधी करताना अडचणी येऊ नये. धार्मिक भावना दुखावल्या जातील असा देखावा व पत्रक काढू नये. देखाव्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली पाहिजे. पोलीस पाटील यांनी ही गावात लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सूचित केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील,चंद्रकांत काटकर, गणेश भोसले, बाबुराव पवार, वैभव गोडसे, बीजान हारून शेख, ज्योती गायकवाड, विजय जगदाळे, सौ विजया माने, सूर्यकांत तरसे, महादेव बनसोडे, लहुराज काळे,अर्चना हजारे,दिपाली भोसले, वैभव फडतरे,अजिंक्य ठिगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना धार्मिक भावना दुखावल्या जातील असा देखावा व पत्रक काढू नये.देखाव्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली पाहिजे.पोलीस पाटील यांनी ही गावात लक्ष केंद्रित केले पाहिजे, सामाजिक सलोखा करताना पर्यावरण पूरक सण साजरा करावा. महाप्रसाद मुळे कचरा निर्माण होतो.त्याचा विचार करून तोडगा काढण्यासाठी विचार केला पाहिजे. कचरा निर्मूलन केले पाहिजे, प्लास्टिक चा वापर करू नये.निर्माल्य टाकण्यासाठी बॉक्स तयार करून ठेवावे. अशी ही सूचना केली आहे.
वीज जोडणी वायर चांगली असावी. तात्पुरते वीज पुरवठा जोडणी करण्यासाठी वीज वितरण कंपनी कडे अर्ज दिले तर मीटर दिले जातील. डिपॉझिट म्हणून दहा दिवस करिता पाच हजार रुपये भरावे लागतील.असे वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यावेळी दिपक देवकर यांनी प्रास्ताविक केले, रिपाइं खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना ७० डिसीबल आवाज ग्रामीण भागात असावे. अशी सूचना केली. तत्पूर्वी आवाजाचा डेमो दाखविण्यात आला. यावेळी बैठक संपल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी देशमुख यांनी ही चर्चा विनिमय केला.