युनूस तांबोळी
Ranjangaon News : शिरूर : स्वयंभू श्री महागणपतीला पहाटे अभिषेक पोशाख परिधान करून त्यानंतर सुवर्णअंलकार चढविले जातात. फुलांची सजावट व मंगलमय वातावरणात अत्तर, धुप व अगरबत्तीच्या सुंगधी दरवळात होणारी आरती मन प्रसन्न करणारी ठरली. रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांनी गुरूवार ( ता. ६ ) पहाटे पासून रांगा लागल्या होत्या.(Ranjangaon News)
अष्टविनायकामधील हे आठवे स्थान.
पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या पावसाचे दिवस असूनही शेकडो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली.(Ranjangaon News)
अष्टविनायकामधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याच्या पाण्य़ाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या पावसाचे दिवस असल्याने मंदीर परिसरात भाविकांसाठी मंडप करण्यात आला होता. इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.(Ranjangaon News)
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान च्या वतीने महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. (Ranjangaon News)तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळाचे मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.(Ranjangaon News)
फोटो ओळ : रांजणगाव येथील श्री महागणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त केलेली फुलांची आकर्षक आरास(Ranjangaon News)