दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरात आज सोमवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कुरुकुंभ मोरीत साचले आहे. नागरिकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने नवीन कुरुकुंभ मोरीत पावसाचे पाणी साचणार नाही. असे केलेले दावे फेल ठरले आहेत.
नागरिकांनी वाहतूक कोंडीला कंटाळत दौंड शहरातील नवीन कुरुकुंभ मोरी वाहतुकीस खुली केली आहे. आज शहरात केवळ वीस मिनिटे पडलेल्या पावसाने जुनी कुरुकुंभ मोरीत पाणी साचले होते. या मुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील नागरीकांनी नवीन कुरुकुंभ मोरी चा वापर करण्यास सुरवात केली आहे. नवीन मोरीचे काम बऱ्या पैकी पूर्ण झाले असून येथून कोणीही वाहतूक करू नये. या करिता सिमेंट काँक्रीट चे मोठे स्लीपर मोरीच्यादोन्ही ठिकाणी च्या प्रवेशा मार्गावर आडवे टाकण्यात आले आहे.
दौंड येथील कुरुकुंभ मोरीजवळ वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक वैतागून नवीन मोरी जवळील स्लीपर साईडला करून मार्ग वापरतात. थोड्या वेळाने पुन्हा रेल्वेचे अधिकारी येतात. बॅरिकेट लावतात. जुन्या मोरी जवळ वाहतूक कोंडी झाल्यास पुन्हा नागरिक नवीन मोरीचा वापर करतात. असे वारंवार घडत आहे. या मुळे नवीन मोरी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहे.
तर जुन्या कुरुकुंभ मोरी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून. असून या रस्त्याने डबक्याचे स्वरूप धारण केले आहे. या रस्त्यावर जास्त खडे पडल्याने, दुचाकी, चारचाकी, दिव्यांग व्यक्ती,शालेय विद्यार्थी, नागरिक यांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.मात्र या रस्त्याकडे मात्र रेल्वेचे अधिकारी सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान, बारामती मतदार संघाच्या खा. सुप्रिया सुळे ह्या दौंड – सोलापूर लोहमार्ग खाली असलेल्या प्रास्तविक असलेल्या तिसऱ्या कुरुकुंभ मोरीचे काम पाहण्या करिता आले असता रेल्वेचे अधिकारी कामाची माहिती देत फोटो काढतात, पण त्यांना त्याच ठिकाणच्या रस्त्याच्या दुरावस्था का दिसत नाही. असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.
तब्बल आठ वर्ष दौंडकर वेठीस.
दौंड शहराची मुख्य बाजार पेठ तसेच गावठाणाला जोडण्याकरिता आणि वाहतूक कोंडी मधून सुटका होण्या करिता. नवीन मोरीची निर्मिती करण्यात आली. मात्र आठ वर्षे झाली तरी अद्याप नवीन मोरी वाहतूकिस सुरू केली गेली नाही. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी २०१४ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.