Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: भोसरीच्या ‘त्या’ जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना विशेष न्यायालयाचा दणका; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 21:26
Pune News: Special court slaps Eknath Khadse in 'that' Bhosari land deal case; What is the case?

पुणे: भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात (Pune News) माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आरोपातून मुक्तता देण्यात यावी, अशी मागणी खडसे यांनी विशेष न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत खडसे यांचा अर्ज नामंजूर केला आहे. या निर्णयामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Breaking News)

विशेष न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या प्रकरणात 1988 च्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोप निश्चित करण्यासाठी पुरेसा प्राथमिक पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे खडसे यांच्याविरोधात पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खडसे यांच्याविरोधातील कायदेशीर फास अधिक घट्ट होणार आहे. (Marathi News)

न्यायालयाने दिलेल्या आदेशात असेही नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या विविध विभागांनी खडसे यांच्या सांगण्यावरून संबंधित जमीन व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात शासनाच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशीही पुढे सुरू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

या प्रकरणातील आरोपांनुसार, भोसरी तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 52/2A/2 अंतर्गत असलेली जमीन खरेदी करून त्यावर भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही जमीन मूळ उकाणी कुटुंबाच्या मालकीची होती. मात्र या जमिनीबाबत वाद निर्माण झालेला असतानाच खडसे कुटुंबीयांनी ती जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. (Marathi News)

तसेच, एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत पत्नी व जावई यांच्या माध्यमातून ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली, असा आरोपही प्रकरणात करण्यात आला आहे. अधिकाराचा गैरवापर करून सरकारची फसवणूक करत भूसंपादन निधी मिळवण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले असल्याचे विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी नमूद केले आहे. न्यायालयाने खडसे यांचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांच्या विरोधात लवकरच दोषारोप निश्चित होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालयाच्या 2026 मधील सुट्ट्या जाहीर! उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून? लगेच पाहा संपूर्ण यादी

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05
Next Post
Viral News: Principal's quarters attacked and a brawl breaks out in front of the students at the school; Students run away in fear, watch VIDEO

Viral News: मुख्याध्यापकाचा क्वार्टर मारून शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोरच धिंगाणा; तर्राट होऊन वर्गात डांस, घाबरून विद्यार्थ्यांची धावपळ, पहा VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.