नांदेड: नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर (Viral News) तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषद (Nanded News) शाळेत घडलेल्या एका प्रकारामुळे शिक्षण विभागाची मोठी नामुष्की झाली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत वर्मा यांनी चक्क दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर नाच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Nanded Drunk Teacher)

मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गात
मिळालेल्या माहितीनुसार, माहूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळच्या सत्रातच हा प्रकार घडला. मुख्याध्यापक अनंत वर्मा यांनी दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत वर्गात प्रवेश केला. व्हायरल व्हिडिओमध्ये ते मोठमोठ्याने ओरडताना आणि लटलटत नाचताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांच्या या विचित्र वागणुकीमुळे वर्गातील विद्यार्थी घाबरून गेले. काही विद्यार्थी भीतीने रडताना दिसत असून, काहींनी वर्गाबाहेर पळ काढल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते. (Breaking News)

पालकांनी रेकॉर्ड केला व्हिडीओ
शाळेत उपस्थित असलेल्या एका पालकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. प्रकार समोर येताच स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संघटनांनी शिक्षण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित मुख्याध्यापकावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. (Marathi News)
— Prashant Patil (@Prashant_P95) December 10, 2025
Video Credit: @Prashant_P95
घटनेची तात्काळ दखल
या घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अनंत वर्मा यांना सोमवार, दिनांक 8 डिसेंबर रोजी निलंबित केले आहे. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, वर्मा यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियमांचे उल्लंघन केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद नांदेड येथे राहणार आहे. या कालावधीत त्यांना अर्धवेतन भत्ता देण्यात येईल. तसेच कोणताही खासगी व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. (Marathi Batmya)







