Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर आमदार नारायण आबा पाटील यांचा हक्कभंग प्रस्ताव; विधानसभा सभापतींकडे लेखी मागणी

सागर घरतby सागर घरत
Wednesday, 10 December 2025, 22:10
MLA Narayan Aba Patil's proposal for violation of rights against Karmala Tehsildar Shilpa Thokde; Written demand to the Assembly Speaker

करमाळा: नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र (Karmala News) विधानसभा हिवाळी अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील प्रशासनिक (Narayan Aba Patil) अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची औपचारिक मागणी केली असून हा प्रस्ताव विधानसभा विशेषाधिकार समिती अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. (Solapur News)

आमदार नारायण पाटील स्वतः या विशेषाधिकार समितीचे सदस्य आहेत. समितीकडून हा प्रस्ताव आता विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या पुढे पाठवला जाणार आहे. आमदार पाटील यांनी सभापतींना स्वतंत्रपणे लिहिती तक्रारही दिली आहे. भ्रष्टाचार, दिरंगाई आणि नागरिकांच्या तक्रारींचा परिणाम काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या आमसभेत अनेक नागरिकांनी महसूल विभागातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत, कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांमधील त्रुटींविषयी गंभीर तक्रारी केल्या होत्या.

या सभेत आमदार पाटील यांनी प्रशासन अधिक गतिमान व्हावे, नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक आणि वेळेत न्याय मिळावा, असे स्पष्ट निर्देश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. तथापि, अपेक्षित सुधारणा न झाल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचार, शेती वादांची प्रलंबित प्रकरणे, अतिवृष्टीतील नुकसानभरपाईसाठी घेतले जाणारे कथित कमिशन, तसेच सेवा वितरणातील ढिसाळपणा या तक्रारी वाढतच चालल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला.

 

प्रशासनात खळबळ; जनतेकडून आमदारांना पाठिंबा
आमदारांनी पूर्वीच इशारा दिला होता की, जर अधिकारी कामचुकारपणा करत राहिले तर त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल. परंतु परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. करमाळा मतदारसंघातील इतर काही अधिकारी भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणाबाबत तक्रारींच्या निशाण्यावर असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून, जनतेतून मात्र त्यांच्या भूमिकेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post
पुणे पोलीस दलात 2 हजार जागांसाठी भरती! शिपाई, चालक, बँडसमन आणि कारागृह पदांसाठी मोठी चुरस.. पुणे: पुणे शहर पोलिस दलाच्या 2024-25 भरती प्रक्रियेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई या पदांसाठी राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असल्याचे चित्र आहे. उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा पुणे शहर पोलिस दलात एकूण सुमारे 2000 पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये 1733 पोलिस शिपाई, 105 वाहनचालक, 33 बँडसमन आणि कारागृह विभागातील 130 शिपाई पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख सुरुवातीला 30 नोव्हेंबर होती. मात्र उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. शहराची निवड करणं बंधनकारक राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध ठिकाणी एकाच दिवशी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांना केवळ एकाच शहरात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना शहराची निवड करणे बंधनकारक असणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना इ-मेलद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा कारागृह शिपाई पदासाठीची भरतीही पुणे शहर पोलिस दलामार्फतच घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (उंची, छाती, धावणे), कागदपत्रांची पडताळणी आणि वाहनचालक पदासाठी कौशल्य चाचणी अशा टप्प्यांत पार पडणार आहे.

Pune Police Bharati: पुणे पोलीस दलात 2 हजार जागांसाठी भरती! शिपाई, चालक, बँडसमन आणि कारागृह पदांसाठी मोठी चुरस..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.