Pune News : पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला किमान १५ लाख आणि कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेद्वारे सरकारकडून गाई पाळा, अनुदान मिळवा, असा संदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यात गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने यंदा पुनर्जीवित केली आहे. या योजनेला गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना असे नाव देण्यात आले आहे.(Pune News)
गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने यंदा पुनर्जीवित केली आहे.
या योजनेंतर्गत अधिकृत नोंदणीकृत असलेल्या आणि किमान तीन वर्षांचे ताळेबंद सादर करू शकणाऱ्या गोशाळांना गाईंच्या एकूण संख्येच्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे.(Pune News) यानुसार किमान ५० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी १५ लाख आणि किमान १०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी सांगितले.(Pune News)
या आधीही ही अनुदान योजना सुरु कऱण्यात आली होती. परंतु गेली काही वर्षे ही योजना बंद होती. यंदा पुन्हा ती पुनर्जीवित केली आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना येत्या १९ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.(Pune News)
दरम्यान, या योजनेचा मूलभूत उद्देश, दिले जाणारे अनुदान, अनुदान मागणीसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज आणि अर्ज करण्याची पद्धत आदींबाबतची माहिती आपापल्या पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे मिळू शकणार आहे. अनुदान मागणीचे अर्जही पंचायत समित्यांकडेच करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.(Pune News)