Shirur News : पुणे, ता.२३ : जंगलतोड, वाढलेले ऊसाचे क्षेत्र, माणसांन जंगलावर केलेले अतिक्रमण, त्यामुळे बिबट प्राणी मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. त्यामुळेच शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातून वाहणारी कुकडी व घोडनदी किनारी बिबटचा धोका वाढला आहे. त्याची तिव्रता पुढील दोन-चार महिने अधिक राहणार आहे. कारण हा बिबट्यांचा प्रजनन काळ आहे. मादी बिबट पिल्लांना जन्म देणार आहे. त्यासाठी ती ऊस पट्ट्यात सुरक्षीत असल्याचे मानू लागली आहे. त्यासाठी जंगलातून बाहेर पडू लागली आहेत. आता मानवाने सावध राहण्याची गरज असून हाच एकमेव उपाय आहे. Shirur News
बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी उपाय आवश्यक
सध्या आक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा तीन महिन्यांचा बिबट्यांचा प्रजनन काळ सुरू आहे. त्यांना आपल्या बछड्यांची सुरक्षितता जंगलापेक्षा ऊसात अधिक वाटते. जंगलात बछड्यांना तरसापासून अधिक धोका असतो. त्यामुळे बिबटे बछड्यांना ऊसात सुरक्षित ठेवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. ऊसात राहून त्यांना गावठी कुत्री, कोल्हे, ससे, धुशी अशी भक्ष्य सहज उपलब्ध होतात. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने शेतकरी व ऊसतोड मजुरांनी आपल्या व कुटूंबाच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहायला हवे.
दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावात बिबट्याचे दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवर व माणसांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत. त्यावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. विशेषतः आंबेगाव, शिरूर, राजगुरूनगर, जुन्नर या भागातील ऩदीकाठच्या ऊसपट्ट्यातील नागरिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहिले पाहिजे. अशीच स्थिती आहे. Shirur News
शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या भागात बिबट्यांची दहशत असल्याने दिवसा विज मिळणे गरजेचे आहे. मागिल काळात बिबट हल्ल्यात 12 नागरिकांचा मृ्त्यू तर 43 जख्मी झाले असून 1300 पाळीव प्राण्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या पुढील काळात देखील वनविभागाने काळजी घेऊन बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाय करावेत. जागोजागी गस्ती घालावेत. तसेच उसाच्या फडात बिबट्याचे बछडे आढळल्यास तत्काळ तेथे भेट देऊन उपाय योजना कराव्यात. Shirur News
देवदत्त निकम
(माजी अध्यक्ष – भिमाशंकर सहकारी साखर कारखाना)
आक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांत बिबट्याचा प्रजनन काळ असतो. बिबट्यांचा अधिवास हा सध्या ऊस क्षेत्रांमध्ये वाढू लागला आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर आणी शेतकऱ्यांनी या कालावधीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागाने देखील मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
राजेंद्र गावडे (माजी संचालक – घोडगंगा सहकारी साखर कारखाना)
आंबेगाव, शिरूर, जुन्नर व राजगुरूनगर या भागातील बिबटे हे वनक्षेत्रातील बिबटे आहे. हे जंगली प्राणी असल्याने भक्ष पकडण्यासाठी ते अधिक आक्रमक असतात. सध्या बिबट हे मानववस्ती व ऊसाच्या क्षेत्रात वात्सव करून राहत असल्याने ते मोकाट कुत्री, जनावरे, मोर, वानरे, डुक्कर या प्राण्यांवर गुजराण करतात. त्यामुळे गावकऱ्यांनी सावध रहावे. लहान मुलांना एकटे सोडू नये.
सुभाष पोकळे (माजी पंचायत समिती सदस्य)
चौकट
हे करा उपाय…
1) बंदिस्त गोठा करून पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा.
2) ग्रामस्थांनी गाव आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
3) घाणी मुळे डुकरे आणि मोकाट कुत्र्यांची संख्या वाढते तिला आळा घाला
4) घराशोजारिल आडगळ व झुडपे काढा
5) गावात पुरेशी विद्युत व्यवस्था करा.
6) रात्री शेतात बॅटरी, मोबाईल, रेडीओचा वापर करा. शेतावर एकत्रीत जा
7) ऊसतोडी पुर्वी शेत परिसरात फटाके वाजवा. ऊसतोडणी कामगारांनी लहान मुलांना एकटे सोडू नका.