पुणे : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानने पलटवार करण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय सैन्याने सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.पाक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनही अलर्ट मोडवर आले असून पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुण्यात ही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत भाविकांची गर्दी असणारे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच दंगल नियंत्रण पथक देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानने उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नरगोटा येथे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने ते सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. भारताकडून पाकिस्तानवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली गेली आहेत.दरम्यान भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर पुणे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.