राहुलकुमार अवचट
यवत : अखिल भारतीय मराठा महासंघ, भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र भुलेश्वर (ता. दौंड ) येथे चौथ्या श्रावणी सोमवार निमीत्ताने २५ बेलाची झाडे मंदिर परिसरात लावण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न इतिहास संशोधन मंडळ प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, कवी, लेखक दशरथ यादव, इतिहास संशोधन मंडळ पुरंदर तालुकाध्यक्ष अमित पवार उपस्थित होते.
दौंड तालुका मराठा महासंघ उद्योग व्यापार आघाडीचे अध्यक्ष सुरज चोरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडांचे सौजन्य देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, वकील आघाडीचे अजित दोरगे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, युवक कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, उद्योग व्यापार आघाडी सचिव चंद्रकांत आहेरकर, दौंड तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा रोहिणीताई दोरगे, दौंड तालुका बहुजन आघाडी उपाध्यक्ष रोहित कांबळे, यावेळी दौंड, पुरंदर, हवेली तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
दर श्रावण सोमवारी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या श्रावण सोमवारी तुळशी रोप, दुसऱ्या सोमवारी फराळ चिवडा वाटप, तिसऱ्या सोमवारी पोलीस बांधव रक्षाबंधन व चिक्की वाटप, शेवटच्या सोमवार निमीत्ताने बेलांचे वृक्षारोपण करण्यात आले. विविध उपक्रमाचे हे भुलेश्वर येथील सहावे वर्ष आहे.