सुरेश घाडगे
परंडा : Paranda News – परंडा (paranda) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा (news-district-and-additional-sessions-court)उद्घाटन (inaugurated) समारंभ रविवार (दि. १९ ) (sunday) न्यायमूर्ती अरुण रामनाथ पेडणेकर (उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती) यांच्या हस्ते तर अंजू शंकरराव शेंडे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . (paranda news)
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशन चे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील हे प्रमुख पाहुणे आहेत. या समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा न्यायाधिश – १ परंडाविश्वास गणपत मोहिते व विधीज्ञ मंडळ, परंडा अध्यक्ष रणजित शिवाजीराव खरसडे यांनी केले आहे.
या न्यायालयामुळे न्यायालयीन कामकाज गतीमान होऊन पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळून गैरसोय थांबण्यास मदत होईल. विशेष म्हणजे परंडा विधानसभा मतदार संघात दोन ठिकाणी परंडा व भूम अशा लहान तालुक्यात असे न्यायालय स्थापन होण्याची बहुधा महाराट्रातील एकमेव घटना आहे.
दरम्यान, दुपारच्या सत्रात अॅड. सुधाकर आव्हाड यांचे हिंदू वारसा कायदा या विषयावर तर अॅड संग्राम देसाई यांचे भ्रष्टाचार कायदा या विषयावर व्याख्यान होणार आहे. २०२० नंतर नोंदणी झालेल्या वकीलांना कायदा पुस्तिकांचे वितरण महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे.