लोणी काळभोर, (पुणे) : ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात त्वरित कारवाई करून दंड आकारावा तसेच अतिक्रमण काढण्याचे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व घरात पाणी शिरून नुकसान झालेचे पंचनामे करण्याची मागणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
हवेली व शिरूर तालुक्यातील लोणी काळभोर, पेरणे, कोंढापुरी, कानुर मेसाई, रांजणगाव या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोणी काळभोर (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील पाटील वस्ती (खोमणे वस्ती) येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी दानवे बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत दादा काळभोर, तहसीलदार तृप्ती कोलते, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भरती काळभोर, जिल्हा महिला आघाडी संघटिका श्रद्धा कदम, जिल्हा संघटक रमेश भोसले, जिल्हा समन्वयक उर्मिला भुजबळ, तालुका महिला आघाडी छाया महाडिक, तालुका संघटक तानाजी कुंजीर, विभागप्रमुख सुभाष कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य, राहुल काळभोर, तलाठी शिवकुमार शिवले, ग्रामविकास अधिकारी जयेश बोरावणे, मंडळाधिकारी गौरी तेलंग, पशुवैद्यकिय अधिकारी नीता लाडुकर, स्थानिक गावकरी उपस्थित होते.
यापुढे बोलताना दानवे म्हणाले, “या पावसाने अनेक ठिकाणची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. ओढे-नाल्यांचे पाणी शेतात घुसून अनेकांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली. त्या आधारे प्रशासनाने कृषी विभाग आणि महसूल विभागाला या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे.