अजित जगताप
सातारा : महाराष्ट्रात नऊ हजार ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच आहेत. पण,त्यांना पंचायत समितीच्या आवारात बैठकीसाठी कक्ष नाही पण,वडूज ता खटाव येथे एक दिवसीय आंदोलनाच्या दणक्याने वडुजमध्ये सरपंच परिषदेसाठी उघडले पंचायत समितीच्या कक्षाचे द्वार याची अनुभूती आली आहे.
खटाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच संघटनेने यंदाच्या वर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी खटाव(वडूज) तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वार नजिक विविध मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या व्याप्ती वाढू नये याची काळजी म्हणून खटावचे तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी अमित पंडित व कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी,बांधकाम विभागाचे कोकणे हे शासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.त्यामध्ये डॉ संतोष देशमुख, डॉ महेश गुरव,कृणाल गडांकुश, परेश जाधव,गणेश भोसले, इम्रान बागवान,डॉ संतोष गोडसे,विक्रम रोमण, जेष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर,पत्रकार आकाश यादव,बालाजी निंबाळकर, पी. डी. सावंत,चंद्रकांत जाधव,आनंदा साठे, अजित कंठे, संतोष भंडारे, अंकुश दबडे,चंदू काटकर, राजू माने, बाळू काळे, सरपंच-उपसरपंच परिषदेच्या आंदोलनाला खटाव तालुक्यातील जनरेट्याचे स्वरूप आल्याने अखेर प्रशासनाला लेखी मागणी मान्य करून लोकशाही आंदोलनाची आब राखली.
त्याबद्दल प्रशासनाचे ही जाणकार मंडळींनी कौतुक केले. या आंदोलनाला योगेश जाधव,सौ शितल देशमुख, नितीन शिंगाडे, सौ. ऍड. कांचन बागल, संघटनेचे सचिव सौ. सुनिता मगर,सौ. रेश्मा इंगवले,डॉ. वैभव माने, सौ. लता शिंगाडे, सौ. वृषाली रोमण,सौ. लता गलांडे,ऍड. रोहन जाधव, किसन मगर,हसन शिकलगार, सुरेश शिंदे,सौ शितल जाधव,सौ नंदा करमारे,गजानन कुऱ्हाडे,पटवेकर यांच्यासह मान्यवर विविध गावातील सरपंच-उपसरपंच सहभागी झाले होते.
आज सकाळी खटाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी सदर नियोजित सरपंच-उपसरपंच संघटना साठी देण्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयातील कक्षची पाहणी केली. आता याठिकाणी सरपंच-उपसरपंच तसेच ग्रामसेवक,ग्रामसेविका यांना ही निवारा लाभणार आहे.
सदर कक्षासाठी टेबल, खुर्ची व पंखे तसेच इतर आवश्यक प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.काही गांवाच्या सरपंच-उपसरपंच यांनी स्वखुशीने सामाजिक बांधिलकी म्हणून याठिकाणी वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. या आंदोलनाला सामान्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दिला पण, काही सुशिक्षित वर्ग अनभिज्ञ असल्याचेच दिसून आले. त्याची ही दिवसभर चर्चा सुरू झाली आहे.