Pachgani News : पाचगणी : नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) या गावात सह्याद्री प्रतिष्ठान व ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांच्या सहकार्यातून नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक उभे रहाणार आहे. (A grand memorial of Narveer Tanaji Malusare will stand)
भूमीपूजनाचा सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते
या स्मारकाचा भूमीपूजनाचा सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना सह्याद्री प्रतिष्ठानचे गुरुवर्य श्रमिक गोजम गुंडे म्हणाले, ‘नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमीत उभे राहणारे स्मारक गोडवली ग्रामस्थांबरोबरच जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल. (Pachgani News) त्याचबरोबर येथील युवा पिढीसाठी, विद्यार्थींना वेळोवेळी त्यांच्या आदर्शांची जाणीव करून देत राहील.’
छत्रपति उदयन महाराज यांचे स्विय सहाय्यक व सातारा भाजपा सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष पंकज चव्हाण यांच्या हस्ते सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे गुरुवर्य श्रमिक गोजम गुंडे,ज्येष्ठ दुर्गसेवक हरिश्चंद्र बागडे, सागर माने, सुभेदार चित्रपटाचे निर्माते प्रद्योत पेंढारकर, विनोद जावळकर, अनिकेत जावळकर, सुभेदार तानाजी मालुसरे संस्थेचे राज्य अध्यक्ष अंकुश आबा मालुसरे,तपणेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश मालुसरे, (Pachgani News) सोसायटीचे चेअरमन आर डी मालुसरे, जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम मालुसरे, विनोद कळंबे, संतोष बेलोसे, भरत जाधव, माजी सरपंच सुरेश मालुसरे गावचे सरपंच मंगेश पवार,उपसरपंच विष्णू मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य, सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान दुर्ग सेवक सेविका, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani news : पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावरील एका घोड्याला दयामरण…