New Delhi : नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (सोमवार ता. ९) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली.
तीन डिसेंबरला मतमोजणी
या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका या सर्वच राजकीय पक्षांसाठी लोकसभेची उपांत्य फेरी असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. राजस्थानमध्ये २०० जागा आहेत तर मणिपूरमध्ये ४०, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणामध्ये ११९ जागांवर विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये सत्तेत आहे. (New Delhi ) राजस्थान राज्यात प्रत्येक पाच वर्षानंतर सरकार बदलत असते. त्यामुळे राजस्थानमध्ये परंपरेनुसार सत्ताबदल होतो की काँग्रेसची सत्ता कायम राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ २३ डिसेंबर रोजी संपणार असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानच्या विधानसभेचा कार्यकाळ १६ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराममध्ये एकूण १.७७ लाख मतदान केंद्रे असतील, त्यापैकी १.०१ लाख केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा असेल. (New Delhi ) मध्य प्रदेशातील आदिवासींसाठी राखीव असलेल्या वनक्षेत्रात मतदान केंद्रे उभारली जाणार असल्याचे राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या एकूण ६७९ जागा आणि १६.१४ कोटी मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. पीडब्ल्यूडी मतदार १७.३४ लाख, वय वर्षे ८० च्या पुढील मतदारांची संख्या २४.७ लाख असून, या सर्वांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा असेल असेही यावेळी सांगण्यात आले आहे.
निवडणूक कार्यक्रम दृष्टीक्षेपात
* मिझोराम – ७ नोव्हेंबर रोजी मतदान
* छत्तीसगड – ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान
* मध्य प्रदेश – १७ नोव्हेंबर रोजी मतदान
* राजस्थान – २३ नोव्हेंबर रोजी मतदान
* तेलंगणा – ३० नोव्हेंबर रोजी मतदान
* पाच राज्यांचा निकाल – ३ डिसेंबर रोजी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi : दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; ६.२ तीव्रतेचा भूकंप