New Delhi : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला. मंगळवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हा भूकंप झाला. दिवसभरात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप ४.२ रिश्टर स्केलचा तर त्यानंतर यापेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप झाला. याची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.
दिवसभरात दोनदा जाणवले धक्के
उत्तर भारतातील विविध भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपानंतर उत्तराखंडच्या देहरादून येथील लोक इमारतींमधून बाहेर आले होते. (New Delhi) यावेळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. दुसऱ्यांदा झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. या भूकंपात घरांची पडझड झाल्याची अथवा कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.
या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. (New Delhi) त्यानंतर आता उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. याशिवाय, काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर आज भूकंपाचे धक्के जाणवले.