पुणे :बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मात्र आता राजीनाम्यानंतर ही धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बदलत्या मराठवाड्याचा संदर्भ देत त्यांनी मुंडेंविरोधात स्ट्राँग मुंडे देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मराठवाड्यातील सामाजिक, राजकीय समीकरणं बदलली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात स्ट्रॉंग मुंडे देण्याची मागणी केली आहे.त्यांनी त्यासाठी या डॅशिंग अधिकाऱ्याचे नाव सुद्धा सुचवले आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या , मराठवाड्याला आता कोणी खूप स्ट्राँग व्यक्ती देण्याची गरज आहे. कोणाचेही न ऐकणारा असा व्यक्ती हवा आहे. तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्राँग ऑफिसर आणि स्ट्राँग व्यक्तिमत्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या विरोधात कृषी घोटाळ्याची मालिकाचं आहे.त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं. कृषी घोटाळा काढला होता. एक सामाजिक न्याय मंत्री असतानाचे त्यांचे व्हिडिओज बाहेर येत असल्याचे दमानिया म्हणाल्या.आता राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.