Mumbai News : मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले. त्यामुळे केंद्र सरकराने या योजेनासाठी अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Mumbai News) त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
१ कोटी ५० लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला सहभाग
आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील २४ तासांत ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Mumbai News) उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री मुंडे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? मविआमध्ये नाराजीनाट्य; मन वळविण्याचा प्रयत्न….
Mumbai News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेस गोळीबार; आरोपी चेतन सिंह जीआरपीच्या ताब्यात