दिनेश सोनवणे
दौंड : मिरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील जनावरांसाठी येत्या दोन दिवसात संपूर्ण लसीकरण केले जाणार आहे. सध्या देशभरात लम्पि या आजाराने, थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात लम्पि या आजाराची लागण झाली आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे.
दहिटने (ता दौंड ) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. घुगे त्यांचे सहकारी सागर शिंदे यांच्या मार्फत जनावरांना लंपी या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण देण्यास बुधवारी (ता. १४) सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण गावातील, वाड्या-वस्त्या येथील जनावरांना १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे मिरवडी गावचे सरपंच सागर शेलार यांनी सांगितले.