Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करू नका. मराठा आंदोलनाच्या दरम्यान राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. जाळपोळ झाल्यास वेगळा निर्णय घेणार, असे ठाम सांगितले आहे. तरी देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
कठोर कारवाई करण्याचे आदेश
मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते.
राज्यात अनेक ठिकाणी बस, आमदारांचे घरं जाळण्यात आले. राज्यात जर हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आले आहेत. मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत काय घडलं?
पोलीस महासंचालकांनी दिवसभरातील घडामोडींचा आढावा समोर ठेवला. मराठा आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. हे समाजकंटक शोधण्याचं काम सुरु. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहे.