Maratha Reservation : नाशिक : एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. तर दुसरीकडे वर्षाचा सण दिवाळी तोंडावर आली आहे. आरक्षणासाठी मराठा बांधव राज्यभरात आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र आता नाशिकमध्ये मराठा बांधवांनी दिवाळी सण साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी
मनोज जरांगे पाटलांची काळजी : नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वाभिमुख ठराव घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बघता व मराठा समाजाचे सध्याचे हाल बघता नाशिक शहर व जिल्ह्यात एक ही घरात दिवाळी साजरा होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
50 दिवसापासून साखळी उपोषण : गेल्या 50 दिवसापासून नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. नाना बच्छाव यांनी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहेत. याच ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे झगडता आहेत.