मुंबई : भारतातील इंधन कंपन्यांनी आज एक डिसेंबर रोजी आपले दर जाहीर करताना यात कोणताच बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. यामुळे या महिन्यात देखील मागील महिन्याच्या दरातच एलपीजी गॅस उपलब्ध होणार आहे.
दर महिन्याच्या एक तारखेला भारतीय इंधन कंपन्या आपले दर जाहीर करतात. मात्र यावेळी या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती व व्यवसायिक गॅस यांच्या दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, असे म्हणता येऊ शकेल. इंधन कंपन्यांनी दर कमी करावेत अशी मागणी ग्राहकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
दिल्लीत १४.२ किलो सिलेंडर १०५३ रुपये, मुंबईत १०५२.५० रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये असून चेन्नईमध्ये १०६८.५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
व्यवसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर १९ किलोचा असतो. दिल्लीमध्ये १७४४ रुपयांना, कोलकाता येथे १८४६ रुपयांमध्ये, मुंबईत १६९६ रुपयांना तर चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी १८९३ रुपये मोजावे लागतात.