लोणी काळभोर, (पुणे) : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. लहान मुलांना प्रेरणा मिळावी या भावनेने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कदमवाकवस्ती येथील १२० मुलांना शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अवघे ४९ वर्षांचे जीवनमान लाभले होते. दीड दिवसच शाळेत गेलेले अण्णाभाऊ यांच्या वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत दुःखाचा डोंगर उचलत शोषित-पीडितांचे जगणे आपल्या साहित्यामध्ये अधोरेखित केले. त्यांनी ३५ कादंबऱ्या, १३ कथा, ७ चित्रपट कथा, १ प्रवास वर्णन, नाटके, पवाडे, शाहिरी पुस्तक वगनाट्य असे प्रचंड साहित्य लेखन करून माणसातील माणूसपण जपले.
कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कदमवाकवस्तीचे तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे, सदस्य अविनाश बडदे, स्मिता लोंढे, माजी सदस्य नितीन लोखंडे, सतीश काळभोर, ज्ञानेश्वर नामुगडे, दीपक काळभोर, गौरव काळभोर, अमोल टेकाळे, अभिजीत पाचकूडवे, अंगणवाडी केंद्रप्रमुख नायर, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय रणदिवे, रोहित अडागळे, सुरज मात्रे, रोहित सोलंकी, गणेश भिसे, भाऊ झेंडे, अनिकेत अडागळे, संदीप मात्रे, गुड्डू झेंडे, सुजल शेंडगे, अशोक मात्रे, राकेश अडागळे, विकी काळे, नागेश दोडके, साहिल सकट, रितेश अडागळे, जय मात्रे, गणेश मोरे, अभी भिसे, आदित्य भंडलकर, अतिश मोरे तसेच पत्रकार पंढरीनाथ नामगुडे, दिगंबर जोगदंड व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश मात्रे यांनी केले. तर सर्व प्रमुख पाहुण्यांचे माता-भगिनींचे आभार लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट यांनी मानले.