विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरुवारी (ता.२८) न काढता रविवारी (ता. १) काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपारिक पध्दतीने रविवारी (ता. १) मोठ्या उत्साहात साजरी केली.
विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील बागुल शहा वली दर्गा या ठिकाणापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. (Loni Kalbhor) यावेळी लोणी काळभोर गावातून मिरवणूक काढण्यात आली. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन या परिसरात मिरवणूक आली असता रमजान तांबोळी, इजाज खान, फिरोज मेटकरी, समीर खान, इरफान शेख, ताहीर शेख यांनी मिरवणुकीतील बांधवांना फळांच्या ज्यूस वाटप केले. तसेच आलेल्या प्रत्येक नागरिकाला गुलाबाचे फुल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यानंतर ही मिरवणूक कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन येथून इंदिरानगर, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बागेतून पुन्हा बागुल शहा वली दर्ग्यापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण केले. सर्व उपस्थित बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. (Loni Kalbhor) या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आलमगीर ट्रस्टचे रहिमान इनामदार, फय्याज इनामदार, अफजल इनामदार, इम्रान शेख, मौलाना मेहबूब शेख, मौलाना गुलाम रब्बानी, मौलाना हसनेन रजा, हनीफ रिजवी, आदम इनामदार, गफूरभाई शेख, ताहेर खान, आयाजभाई इनामदार, हाजी मुसाभाई तांबोळी, रशीद इनामदार आदि उपस्थित होते.
दरम्यान, ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण आहे. पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची तयारी मुस्लिम बांधवांनी जोरदार केली होती. (Loni Kalbhor) ईदनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या निमित्ताने धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहर व मुस्लिम मोहल्ल्यातील मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लिम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली होती.
पोलिसांचाही चोख बंदोबस्त
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, हनुमंत तरटे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे. पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीसह पुणे-सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
…म्हणून रविवारी ‘ईद-ए-मिलाद’ साजरा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची मोठी मिरवणूक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने लोणी काळभोर येथे ईद-ए-मिलाद रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
– नसीरखान पठाण, उपसरपंच, कदमवाकवस्ती
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : निरोगी हृदय राखणे ही सामायिक बांधिलकी : डॉ. सूरज इंगोले