पुणे : खडकवासला धरणातून बुधवारी (ता. १३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास १३ हजार १३८ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ५ हजार ५६४ क्युसेक विसर्ग वाढवून १३ हजार १३८ क्युसेक करण्यात येणार आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.