गणेश सुळ
Kedgaon News : ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, असा बाबासाहेबांचा प्रेरणादायी आदर्श समोर ठेवून सलग गेली पाच वर्षे दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील, मसनेरवाडी येडेवाडी, जगदाळे वस्ती, शाहूनगर या परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्ष वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.(Kedgaon News)
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,
लिंगाळी पंचक्रोशीतील नागरिकांचे व पालकांचे लक्ष वेधले आहे, हा आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सलग सुरू ठेवणारे लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील, विजय विलास बगाडे, व मौजे मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील, अश्विनी विजय बगाडे, या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील, मसनेरवाडी, येडेवाडी, जगदाळे वस्ती, शाहू नगर या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 115 विद्यार्थी मुला-मुलींना शालेय साहित्य आणि वृक्षवल्ली रोपांचे मान्यवरांच्या हस्ते वाटत करण्यात आले.(Kedgaon News)
यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश आण्णा भागवत, लिंगाळी ग्रामपंचायतचे सरपंच सुनिल जगदाळे पाटील, अश्विनी बगाडे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे आणि मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील अश्विनी बगाडे या कुटुंबाने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा उपक्रम गेली पाच वर्षांपासून सुरू केला आहे.(Kedgaon News)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून बगाडे पाटील कुटुंबाने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुला-मुलींना वाटपाचा उपक्रम सुरू केला असल्याचे निदर्शनास आले आहे. लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे व त्यांच्या पत्नी मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील, अश्विनी विजय बगाडे, यांनी परिसरातील बहुजन समाजातील मुला मुलींच्या शैक्षणिक कार्यात खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.(Kedgaon News)
यावेळी लिंगाळी पंचक्रोशीतील पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण काळे यांनी केले तर लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.