Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : पंतप्रधान मोदींनी देशाची प्रगती 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आणली ; आमदार राहुल कुल यांचे गौरवोद्गार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 10:03

संदीप टूले
Daund News :  देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असल्याने देश प्रगतीच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर आपण आलो आहोत. बाकीच्या देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जलसंपदा विभाग खडकवासलाचे पाणी टनेलच्या माध्यमातून आणण्यासाठी 2 हजार कोटी आणि 14 हजार कोटींची जागा वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे अडीच ते तीन टीएमसीचे पाणी उपलब्ध होणार आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.(Daund News)

अडीच ते तीन टीएमसीचे पाणी उपलब्ध होणार आहे.

चौफुला (ता. दौंड) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार कुल यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध चांगल्या योजना या सरकारच्या काळात आल्या असल्याचे सांगत योजनांवर भाष्य केले. ते म्हणाले, युद्ध सामग्री आयात करण्याऐवजी स्वदेशी साहित्य निर्मिती देशात सुरू झाली. पीएम आवास योजना असो अथवा कोरोना काळात योग्य नियोजन करून लस तयार करण्याचे काम केल्याने देशाची मान उंचावली आहे.(Daund News)

2024 ला मोदी पंतप्रधान होतील, अशी मानसिकता विरोधकांचीही झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षालाही केंद्र सरकारच्या कामामुळे त्यांना नावे ठेवायला जागा मिळत नाही. मुळशी धरणाचे पाणी आपल्या विभागात वळवण्यासाठीची प्रोसेस सुरू आहे. चिबड जमिनीबाबत मी प्रयत्न करतोय, त्यावर लवकरच नियोजन होईल. जनाई, शिरसाई योजना कार्यान्वित होऊन तालुक्यातील सर्व बंधारे भरण्याचा प्रयत्न राहील, असेही कुल यांनी सांगितले.(Daund News)

 

चांगले रस्ते सुरु झालं की दौंड सुरु

दौंड सुरू झालं की खराब रस्ते सुरू होतात अशी टीका व्हायची. आता चांगले रस्ते सुरू झाले की दौंड सुरू झालं असं म्हटलं जातं. 1500 कोटींची तालुक्यातील रस्त्यांची कामे होणार आहेत. कासुर्डी ते पाटस असा 80 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. त्यामुळे लवकरच तेही काम सुरू होईल. हडपसर ते उरुळी असा भारत माला हा रस्ता होणार आहे. तालुक्यात केडगाव-चौफुला-न्हावरा या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.(Daund News)

10 हजार कोटींच्या तरतुदीमुळे फायदा

केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी 10 हजार कोटी रुपये तरतूद केल्याने त्याचा सर्वात मोठा फायदा हा शेतकऱ्यांनाच झाला आहे. कलम 370 रद्द करणे हा विषय त्यांनी व्यवस्थित मार्गी लावला. ग्रामीण भागाचा प्रतिनिधी म्हणून माझी आजही या भागासाठी काहीतरी नवीन देण्याचा, मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना या तालुक्यात आपण राबवत आहोत, असे त्यांनी शेवटी सांगितले.(Daund News)

दरम्यान, या कार्यक्रमाला भीमा पाटसचे व्हाईस चेअरमन नामदेवनाना बारवकर, हरिश्चंद्र ठोंबरे, उमेश देवकर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Kedgaon News : विद्यार्थांना शालेय साहित्य व रोपांचे वाटप करून पोलिस पाटलांनी जोपासली पाच वर्षांची परंपरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.