पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात डेटा एंट्री ऑपरेटर आणि कनिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे, नंदूरबार येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, जिल्हा सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, साक्री रोड नंदुरबार ४२५४१२ येथे अर्ज पाठवावा. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://afmc.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर आणि कनिष्ठ संशोधन फेलो.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा, जीवन विज्ञानमध्ये पदव्युत्तर पदवी, विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात एमएससी.
– वेतन / मानधन : दरमहा 24,800/- ते 31,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मार्च 2024.
– नोकरीचे ठिकाण : नंदुरबार, पुणे.